परभणी, दिनांक 12
भारताची जनगणना २०२७ अंतर्गत पहिल्या फेरीत घर यादी, घराची गणना व ‘स्व-गणना’ १ ते १५ मे या कालावधीत होणार आहे. याची नोंदणी प्रक्रियाही सुरू झाली आहे.
महापौर सय्यद इकबाल यांनी स्वतः स्वगणना केली असून नागरिकांनी देखील स्वगणना करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
यंदाच्या जनगणनेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘डिजिटल नोंदणी’ होय. नागरिकांना गणनेसाठी कर्मचाऱ्यांची (गणक) वाट पाहण्याची गरज नाही; ते स्वतः आपली आणि आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन पोर्टलद्वारे नोंदवू शकतात. यालाच ‘स्व-गणना’ म्हणतात. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुटसुटीत असून नागरिकांना सहज करता येण्याजोगी आहे.
https://se.census.gov.in/ वर जाऊन मोबाईल नंबर आणि ‘ओटीपी’ पडताळणी करा
पोर्टलवर नोंदणी आणि लॉगिन करा,मोबाईल नंबरवर ओटीपी मिळेल.
कुटुंबप्रमुख आणि घराचे लोकेशन कुटुंबप्रमुखाचे नाव नोंदवून मॅपद्वारे घराचे अचूक ‘लोकेशन सेट’ करा,कुटुंबप्रमुख नाव,लोकेशन अशी माहीती ‘सबमिट’ केल्यावर मोबाइलवर येणारा संदर्भ क्रमांक जतन करून ठेवा
…संदर्भ क्रमांक….
मोबाईलवर येणार संदर्भ क्रमांक जणगणनेत जातींची मोजणी होणार असे सांगितले जात होते. प्रत्येक्षात केवळ एससी, एसटी आणि इतर असाच पर्याय देण्यात आला आहे. माहिती पूर्ण भरून सबमिट केल्यानंतर, मोबाईलवर एक संदर्भ क्रमांक (रेफरन्स नंबर) येईल. गणक आल्यावर काय करावे? जनगणना कर्मचारी घरी येतील, तेव्हा त्यांना संदर्भ क्रमांक दाखवा, तुम्ही भरलेली माहिती त्यांना ‘डिव्हाइस’मध्ये दिसेल.
हे नोंदविले म्हणजे झाले…?
नाही, यामध्ये फक्त तुमच्या नावाची नोंद होते, तुमच्या घरच्यांच्या नावाची नाही. ते किती आहेत त्याचा आकडा द्यावा. घरची परिस्थिती आणि इतर प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळतात. त्यामुळे जनगणना कर्मचारी घरी आल्यावर दीर्घकाळ बसून माहिती देण्याची गरज उरणार नाही. तसेच नागरिक स्वतः माहिती भरत असल्याने चुकांची शक्यता कमी असते. जनगणना कर्मचारी आणखी काही माहिती घेऊ शकतात.






