spot_img
spot_img
spot_img

नागरिकांनो, शुक्रवार 1 मे पासून स्व-गणनेस होणार प्रारंभ…! https://se.census.gov.in या पोर्टलवर अचूक माहिती भरावी देश व नागरिकांच्या हितासाठी जनगणना अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्व-गणना करावी — जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

 

 

परभणी, दि. 29 : जिल्ह्यात जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला शुक्रवार दि. 1 मे 2026 पासून प्रारंभ होत आहे. दि. 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना स्व- गणना करता येणार आहे. जनगणना विभागाच्या https://se.census.gov.in या पोर्टलवर परभणी जिल्हयातील नागरिकांनी आपली माहिती अचूक भरावी.

 

जनगणना ही देश व नागरिकांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याने नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जनगणनेत सहभागी व्हावे व स्व-गणना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

 

देशाच्या 2027 च्या जनगणनेची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही देशातील पहिलीच डिजिटल जनगणना आहे. स्व-गणनेची प्रक्रिया झाल्यानंतर जिल्ह्यात दि. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रगणकांद्वारे प्रत्यक्ष घरगणना केली जाणार आहे. त्यापूर्वी नागरिकांना स्वतःची माहिती भरण्यासाठी दि. 1 ते 15 मे 2026 या पंधरा दिवसांच्या कालावधीत स्व-गणनेची विशेष सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

दि. 1 मे रोजी खुले होणार पोर्टल — नागरिकांनी https://se.census.gov.in या पोर्टलवर आपली माहिती भरून स्व-गणना करता येणार आहे. पोर्टल दि. 1 मे रोजी खुले होईल. दि. 15 मेपर्यंत नागरिकांनी माहिती भरता येईल. यानंतर मात्र हे पोर्टल बंद होणार आहे. पोर्टलवर 14 विविध भाषांमध्ये माहिती भरण्याची सुविधा आहे.

 

पोर्टलवर अशी भरा माहिती – आपला मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून जनगणनेच्या https://se.census.gov.in या पोर्टलच्या होम पेजवर ‘स्व-गणना’ (Self Enumeration) पर्यायावर क्लिक करा. तुमचा चालू मोबाईल क्रमांक द्या. त्यावर एक ओटीपी येईल, तो तिथे टाकून पडताळणी पूर्ण करा. लॉगिन झाल्यानंतर सर्वप्रथम कुटुंबप्रमुखाचे नाव, वय, लिंग आणि इतर वैयक्तिक तपशील भरा. नकाशावर आपल्या घराचे अचूक ठिकाण/स्थान दाखवा (चिन्हांकित करा). कुटुंबात एकूण किती सदस्य राहतात (पुरुष, महिला आणि इतर) त्यांची संख्या नमूद करा. घराचा प्रकार (कच्चे/पक्के), पिण्याच्या पाण्याची सोय, वीज, शौचालय, वापरली जाणारी इंधने आदीसह वाहने, संगणक आदी सुविधांची माहिती द्या. सर्व माहिती भरून झाल्यानंतर ती पुन्हा एकदा नीट तपासा. काही चूक असल्यास इडीट (Edit) पर्यायावर जाऊन ती दुरुस्त करा. माहिती पूर्णपणे बरोबर असल्याची खात्री करून घ्या. खात्री पटल्यानंतर सबमीट (Submit) बटण दाबा. अर्ज सबमिट झाल्यावर आयडी क्रमांक मिळेल, तो जतन करून ठेवा, त्याची प्रिंट काढा. तो घरगणनेवेळी प्रगणकाला द्या.

 

माहिती भरल्यानंतर मिळणारा आयडी जपून ठेवावा — पोर्टलवर माहिती यशस्वीरित्या भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला एक स्वतंत्र ओळखपत्र क्रमांक (आयडी) मिळणार आहे. हा आयडी नागरिकांनी मोबाईल किंवा वहीमध्ये नोंदवून ठेवावा.

 

घर भेटीदरम्यान प्रगणकांना द्यावा लागणार आयडी क्रमांक – पोर्टलवर माहिती भरल्यानंतर दि. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष घरांना भेटी देणार आहेत. यावेळी स्वयं गणना झाली असेल, तर संबंधित प्रगणकाला तो आयडी क्रमांक द्यावा लागणार आहे. हा आयडी प्रगणक आपल्याकडील पोर्टलवर अपलोड करेल. त्यामुळे संबंधित नागरिकांच्या कुटुंबाची सर्व माहिती अधिकृरित्या जनगणनेत नोंद होईल. यामुळे प्रश्न विचारणे आणि त्यानुसार माहिती भरणे यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles