परभणी, दि. 29 : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, दि. 1 मे 2026 रोजी सकाळी 8.00 वा. मुख्य शासकीय ध्वजारोहण हे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्हयाच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे.
परभणी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे ध्वजारोहणाचा सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.











Total Users : 254687