spot_img
spot_img
spot_img

अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांची अखिल भारतीय ग्राहक पंचायत पदाधिकाऱ्यांसी संवाद

 

परभणी | प्रतिनिधी

 

परभणी येथे राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्न सुरक्षा व ग्राहक हक्क विषयक महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत अन्न सुरक्षा योजनांची अंमलबजावणी, नागरिकांच्या समस्या व त्यावर उपाययोजना यावर सखोल चर्चा करण्यात आली.

अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी शिधा पत्रिका धारकांनी जागरूक राहून अखिल भारतीय ग्राहक पंचायत पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व राशन मध्ये दिव्यांग. कर्करोग मजूर यांना अंत उदय शीदा पत्रिका मिळण्यासाठी जागरूक राहाण्याचे आव्हाहन केले आयोगाचे अध्यक्ष ढवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले

बैठकीचे सूत्रसंचालन डॉ संदीप चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व सादरीकरण प्रभावीपणे पार पडले.

 

या प्रसंगी डॉ विलास मोरे (प्रांताध्यक्ष, ग्राहक पंचायत) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच पर्यावरण प्रमुख डॉ सगीता अवचार जिल्हाध्यक्ष गुलाबराव शिंदे, तालुका अध्यक्ष सोपान टोले, तसेच पूर्णा तालुका अध्यक्ष जनार्धन अवरगंड, भगवान करजे संभाजी शिराळे शिवाजी दिवटे मोतीराम शिंदे सोपानराव टोले मचंक बचाटे मचंक जगताप अनंंतराव लोखंडे रमाकांत जोशी अब्दुल रहीम आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ संगीता अवचार यांनी आभार प्रदर्शन करून सर्व उपस्थितांचे आभार मानले.

 

या बैठकीमुळे अन्न सुरक्षा व ग्राहक हक्कांविषयी जनजागृती वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles