spot_img
spot_img
spot_img

पत्रकार सुरक्षा समितीचा १० वा वर्धापन दिन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा कार्यक्रम लवकरच अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती*

 

 

सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकार कडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनाला टोल मधून मुक्ती ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर पूरक व्यवसाय करता यावा म्हणून पाच लाख रुपयांचे कर्ज मिळणे त्याच बरोबर पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती अत्यंत प्रभावी पणे काम करत असून पत्रकारांच्या मूलभूत प्रश्ना बरोबर सामाजिक बांधिलकी जपत समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सन्मान पत्र सन्मान चिन्ह शाल व पुष्पगुछ देऊन विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला जातो. यामध्ये खालील क्षेत्रातील व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो.

 

*आदर्श पत्रकार*

 

*आदर्श शिक्षक*

 

*कृषीभूषण*

 

*आदर्श श्रमजिवी*

 

*उत्कृष्ठ सूत्रसंचालक*

 

*आदर्श समाजसेवक*

 

*आदर्श समाज भूषण*

 

*आदर्श समाजिक संस्था*

 

*आदर्श विधिज्ञ*

 

*यशस्वी उद्योजक*

 

*आदर्श लेखक*

 

*आदर्श रुग्ण सेवक*

 

*आदर्श कुटुंब प्रमुख*

 

*आदर्श डॉक्टर*

 

*आदर्श कवी*

 

*आदर्श ग्रामसेवक*

 

*आदर्श तलाठी*

 

इत्यादी क्षेत्रातील व्यक्तीचा विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे उपाध्यक्ष अमर पवार सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्याध्यक्ष राजू वग्गू यांनी दिली आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles