spot_img
spot_img
spot_img

पत्रकार सुरक्षा समितीची बेगमपूर येथे बैठक आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार*

 

सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती ता मोहोळ ची बेगमपूर येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष सागर पवार होते राज्यातील पत्रकारांच्या बाबतीत चर्चा होऊन आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला

गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनाला टोल मधून मुक्ती ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर पूरक व्यवसाय करता यावा म्हणून पाच लाख रुपयांचे कर्ज मिळणे त्याच बरोबर पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती अत्यंत प्रभावी पणे काम करत असून राज्यातील पत्रकारांचे अनेक विषय राज्यसरकार कडे प्रलंबीत असून त्यासाठी व्यापक स्वरूपाचा लढा उभारून आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार पत्रकार सुरक्षा समितीने केला आहे

या वेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा सरचिटणीस बंडू तोडकर उपाध्यक्ष अमर पवार मोहोळ तालुका उपाध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर प्रसिद्धी प्रमुख वजीर मुलाणी सचिव शहाजी शिंदे समाधान गोडसे सोलापूर शहर प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी उपस्थित होते.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles