spot_img
spot_img
spot_img

जनगणना – 2027 : तीन दिवसीय प्रशिक्षणास प्रारंभ* *जनगणना कक्षाचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन*

 

 

परभणी, दि. 23 : जिल्हयात जनगणना-2027 चे कामकाज यशस्वीरित्या व वेळेत पार पाडण्यासाठी आवश्यक पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज तीन दिवसीय प्रशिक्षणास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. तत्पुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या जनगणना कक्षाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले.

 

प्रशिक्षणास निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जीवराज डापकर, संगीता चव्हाण, प्रशिक्षक जनगणना संचालनालयाचे सहाय्यक संचालक सुनिल आत्राम, जिल्हा समन्वयक संजय नाईक, संदिप कुलकर्णी आदी प्रशिक्षकांसह तहसीलदार, नगरपालिका व नगरपंचायतचे मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकारी व उपस्थित होते.

 

 

आगामी जनगणना ही देशातील 16 वी जनगणना आणि स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना असेल जनगणना ही गाव, शहर आणि वॉर्ड स्तरावरील प्राथमिक आकडेवारीचा सर्वात मोठा स्रोत आहे. आता केली जाणारी ही जनगणना विशेष आणि उल्लेखनीय आहे कारण ही भारतातील पहिली जनगणना असेल ज्यामध्ये माहिती संकलन डिजिटल साधनांद्वारे केले जाईल. या जनगणनेत प्रगणक मोबाइल फोनचा वापर करून घरांची माहिती डिजिटल पद्धतीने संकलित करतील. याशिवाय, कुटुंबांना निर्दिष्ट वेब पोर्टलद्वारे स्व-गणनेचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, स्व-गणनेद्वारे सादर केलेल्या माहितीची अचूकता व पूर्णतता ही प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या कडून पडताळणी केली जाईल. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात, म्हणजेच घरयादी व घरगणना, प्रगणक प्रामुख्याने घरांची स्थिती, कुटुंबास उपलब्ध असलेल्या सुविधा आणि मालमत्तेबाबत माहिती संकलित करतील. दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करण्यात येणार आहे.

 

निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षण आयोजनामागील उद्देश आणि महत्त्व स्पष्ट केले. जनगणना संचालनालयाचे सहाय्यक संचालक सुनील आत्राम यांनी जनगणनेचे काम कशा पध्दतीने पार पाडावयाचे आहे, याबाबत सादरीकरणाव्दारे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, जनगणना-2027 च्या अनुषंगाने दोन टप्यांाात जनगणना केली जाणार आहे. पहिल्या टप्यार्त घरगणना केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्यानयत फेब्रुवारी-2027 मध्ये प्रत्यक्ष जनगणना केली जाणार आहे.

 

जनगणना 2027 मध्ये प्रथमच स्व-गणनेची (Self-Enumeration) पद्धतही सुरू करण्यात येत आहे. या पद्धतीद्वारे व्यक्तींना वेब पोर्टलच्या माध्यमातून स्वतःची माहिती सुरक्षितपणे स्वतःच भरता येणार आहे. ही सुविधा विशेषतः अशा व्यक्ती व कुटुंबांसाठी उपयुक्त ठरेल, जे काम, व्यवसाय किंवा इतर व्यावसायिक कारणांमुळे दिवसभर घराबाहेर असतात. स्व-गणना केलेल्या घरांची सत्यता पडताळण्याची जवाबदारी प्रगणकावर असेल. प्रगणकाने स्व-गणनेची माहिती सादर करण्यापूर्वी ती तपासणे आवश्यक आहे.

 

प्रशिक्षणात जनगणना कार्यातील विविध बाबी, माहिती संकलनाची प्रक्रिया तसेच क्षेत्रीय पातळीवरील अंमलबजावणीबाबत देखील सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles