spot_img
spot_img
spot_img

शहीद दिनानिमित्त जिंतूर येथे भव्य पदयात्रा संपन्न*

 

 

परभणी, दि. 23 : परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात केंद्र शासनाच्या ‘मेरा युवा भारत’ अभियानांतर्गत तसेच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वतीने शहीद दिनानिमित्त भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.

 

देशाची एकता, अखंडता व राष्ट्रभक्तीचा संदेश समाजात रुजविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद मैदान ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 

पदयात्रेला पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, जिल्हा युवा अधिकारी शशांक राऊला, मुख्याध्यापिका श्रीमती राठोड, जिल्हा समन्वयक दीपक खुळे, स्नेहा वाघमारे तसेच दूरदर्शन-आकाशवाणीचे जिल्हा प्रतिनिधी सुदर्शन चापके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.

 

तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांनी स्वच्छतेची शपथ घेतली. प्रास्ताविकात जिल्हा युवा अधिकारी शशांक राऊला यांनी शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या देशासाठी दिलेल्या बलिदानाचा इतिहास उजागर करून उपस्थितांना प्रेरित केले.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles