परभणी, दि. 23 — शहीद दिनानिमित्त देशासाठी बलिदान देणारे थोर क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, संगीता चव्हाण, जनगणना संचालनालयाचे सहाय्यक संचालक सुनिल आत्राम, जिल्हा समन्वयक संजय नाईक, संदिप कुलकर्णी आदींसह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






