पालम/प्रतिनिधी
पालम तालुक्यातील मौजे गुलखंड येथील सामाजिक कार्यकर्ते तरूण तडफदार नेतृत्व,बबर करीम शेख यांची नियुक्ती ए.आय.एम.आय.एम (AIMIM) पक्षाच्या फरकंडा गन सर्कल अध्यक्ष व मौजे गुलखंड शाखा अध्यक्षपदी नुकतीच निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले दिलेल्या नियुक्तीपत्रात नमुद करण्यात आले कि आपण AIMIM पक्षाच्या फरकंडा सर्कल प्रमुख व मौजे गुलखंड शाखा अध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्या बाबत अर्ज केला होता आपली समाजा बद्दलची तळमळ, पक्षा बद्दलची आत्मीयता, लढाऊपणा पाहून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदोद्दीन अवैसी साहेब, महाराष्ट्र अध्यक्ष मा.खा. इम्तीयाज जलील साहेब, मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला खान, माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन साहेब,परभणी जिल्हा अध्यक्ष गौस झैन साहेबांच्या आदेशावरून मज्लिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM च्या फरकंडा गन सर्कल प्रमुख व गुलखंड शाखा अध्यक्षपदी बबरू करीम शेख आपली या वरील पदावर नियुक्ती करण्यात येत आहे
म्हणून 18/03/2026 ते 18/03/2027 ह्या कार्यकाळा करिता नियुक्ति करण्यात येत आहे, आपण सर्व आपली जबाबदारी धाडसाने व सक्षमपणे पार पाडून पक्षाचे काम तळा गळा पर्यंत घेउन जावे व आक्रमकपणे अन्याया विरुद्ध पक्षाची बांधनी करावे, लोकांच्या समस्या सोडविन्या साठी संबंधित कार्यालय, प्रशासना पर्यंत लोक समस्या ठेवण्याचा प्रयत्न करावा तसेच बूथ तेथे शाखा घर तेथे मज्लिसी सैनिक अशी पक्षाची बांधनी करावी. पक्षाची ध्येय धोरणे व उद्देश यांच्याशी सुसंवाद अशी आपली भूमिका असावी. जिल्हा, तालुका व राज्य कार्यकारणीच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करावे,एम आय एम पक्षाचे पालम तालुका अध्यक्ष अनीस भाई खुरेशी यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या निवडीबद्दल गुलखंड येथील गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला व भावि वाटचालीस शुभेच्छा दिल्या






