परभणी/प्रतिनिधी
पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांची महामार्ग सुरक्षा पथक येथे बदली झाली असून त्यांच्या जागी परभणी स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भागवतराव जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सोमवारी(दि. १) ताडकळसचे नवीन ठाणेदार म्हणून पदभार स्विकारला.
सहायक पोलिस निरिक्षक जगताप यांनी परभणी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड ग्रामीण आणि रामतीर्थ येथे ठाणेदार म्हणून सेवा दिली आहे. यांचे ताडकळस पोलीस ठाण्याच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






