spot_img
spot_img
spot_img

मान्सूनपूर्व तयारीबाबत आरोग्य विषय समितीची बैठक संपन्न

 

 

परभणी, दि.29  : जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत आज आरोग्य सभापती वैशाली पंकज आंबेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विषय समितीची बैठक संपन्न झाली.

 

बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ यांनी मान्सूनपूर्व तयारी संदर्भातील आरोग्य विभागाच्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील 830 गावांपैकी 244 गावे नदीकाठची असून 54 गावे जोखीमग्रस्त असल्याने सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 24 तास मुख्यालयी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 

जिल्हास्तरीय साथरोग पथक नियंत्रणात ठेवणे, 37 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये साथरोग नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवणे, अपेक्षित प्रसूती मातांची यादी अद्ययावत ठेवणे तसेच आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले.

 

आरोग्य सभापती यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेचे वेळापत्रक दर्शनी भागात लावावे, पिण्याच्या पाण्याची शुद्धता राखावी, रुग्णवाहिकांची उपलब्धता सुनिश्चित करावी तसेच आपत्कालीन संपर्क क्रमांक नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना केल्या.

 

बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक संचालक कुष्ठरोग अधिकारी, क्षयरोग वैद्यकीय अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, कक्ष प्रमुख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, कनिष्ठ लेखापाल तसेच आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles