पूर्णा प्रतिनिधी दि. 27रोजी तहसील कार्यालय पूर्णा येथे दि.१५ मार्च 2026 जागतिक ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तहसीलदार एम.एन. बोथीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुरवठा निरीक्षण अधिकारी.एस.डी. नाईक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जनार्धन आवरगंड, ग्राहक मंच तालुका अध्यक्ष पूर्णा, . सय्यद सलीम सुहागणकर, शहराध्यक्ष ग्राहक मंच पूर्णा, . पांचाळ, आरोग्य विभागाच्या डॉ. मोहिनी कदम, पंचायत समितीच्या व्ही. एस. कुरडे, म.रा.वि.म.चे प्रतिनिधी हे उपस्थित होते.
कार्यक्रमात, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी जनार्धन आवरगंड यांनी मनोगत व्यक्त करुन ग्राहक दिनाचे महत्व सांगितले. तसेच डॉ. कदम यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली. पी एस कुरवाडे यांनी पंचायत समितीच्या विविध योजना विषयी माहिती दिली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुरवठा निरीक्षकप्रदीपकुमार मोरे यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री. गंगाधर सातपुते, मधुसुदन ढगे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी नागरिक, स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.






