spot_img
spot_img
spot_img

महावितरणच्या विविध *परिमंडळांतील कामांतील *तक्रारींबाबत चौकशी करणार * राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर*

 

 

मुंबई, दि.२३ : महावितरणच्या बारामती, पुणे, नाशिक कोल्हापूर परिमंडळांत आर. एन.इलेक्ट्रिकल्स या कंत्राटदाराकडून बनावट बिलिंग, आर्थिक अपहार व निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अपघात झाल्याबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येईल, असे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत सांगितले.

 

सदस्य महेश सावंत यांनी महावितरणच्या बारामती, पुणे, नाशिक कोल्हापूर परिमंडळांत आर. एन.इलेक्ट्रिकल्स या कंत्राटदाराकडून बनावट बिलिंग, आर्थिक अपहार व निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अपघात झाल्याबाबत लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली. या चर्चेत सदस्य राजू तोडसाम, अभिजित पाटील, प्रशांत बंब यांनी सहभाग घेतला.

 

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले की, वरील प्रकरणात आतापर्यंत झालेल्या चौकशीत संबंधित आर. एन.इलेक्ट्रिकल्स या कंत्राटदाराबाबत कोणतेही निष्कर्ष समोर आलेले नाहीत. संबंधित कंत्राटदाराने ज्या ठिकाणी कामे केली आहेत, तेथे अपघात झाल्याची नोंद नाही. कोल्हापूर परिमंडळात या एजन्सीला काम देण्यात आलेले नसून इतर परिमंडळांतील कामांबाबतही वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तपास करण्यात आला आहे. तरीदेखील, सदस्यांनी मांडलेल्या विशिष्ट तक्रारी व मुद्द्यांचा पुनर्विचार करून त्यावर सखोल चौकशी केली जाईल. आवश्यक असल्यास पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच, सर्व कामांची वेळेत पूर्तता व्हावी यासाठी महावितरणकडून सातत्याने पाठपुरावा केला जातो आणि अपघातांच्या घटनांमध्ये संबंधितांना मदत देण्याची कार्यवाही केली जाते, असेही त्यांनी सांगितले.

 

पात्र एजन्सींना नियमानुसार मान्यताप्राप्त यादीत (नोंदणीकृत यादीत) समाविष्ट करून कामे दिली जातात. संबंधित एजन्सीलाही याच प्रक्रियेनुसार काम देण्यात आले आहे. सदस्यांनी उल्लेख केलेल्या अपघातांच्या दोन घटनांबाबत संबंधित एजन्सीने त्या ठिकाणी कामच केलेले नाही, त्यामुळे त्या घटनांसाठी त्यांना जबाबदार धरता येणार नाही. तसेच, पॉवर ट्रान्सफॉर्मर व ब्रेकरसारखे महत्त्वाचे साहित्य महावितरणकडूनच पुरवले जाते, तर स्थानिक पातळीवरील किरकोळ साहित्यच कंत्राटदारांकडून वापरले जाते, असेही राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी नमूद केले

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles