spot_img
spot_img
spot_img

पाथरी येथे रोजगार मेळावा संपन्न; 74 उमेदवारांची प्राथमिक निवड*

 

 

परभणी, दि. 17 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी आणि वाल्मिक शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाथरी येथील शांताबाई नखाते विद्यालय, शिवाजी नगर येथे आज (दि.17) पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला. मेळाव्यास एकूण 130 उमेदवारांनी हजेरी लावली. त्यापैकी 74 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

 

या मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवीधर अशा विविध शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांसाठी ट्रेनी ऑपरेटर, क्षेत्र अधिकारी, विमा सल्लागार, विमा सखी तसेच मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थी अशा सुमारे 200 पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाल्मिक शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक अनिल नखाते होते. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे, प्रशासकीय अधिकारी आर. एम. टेंगसे तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सि. एस. उस्तुरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. किशन डहाळे यांनी केले. रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रविण रुदकंठवार, राहूल गजभारे, सचिन चव्हाण, राहूल काळे, करिमोदीन अन्सारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles