spot_img
spot_img
spot_img

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

अमेरिकेतील “आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर” पुरस्कार

 

परभणी दि.१५ :- राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना अमेरिकेतील यु.एस. इंडिया एसएमई कौन्सिल, वॉशिंग्टन डीसी (U.S. India SME Council, Washington DC) तर्फे आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर (Outstanding Visionary Leader & True Changemaker) हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 

हा पुरस्कार १४ मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आला असून त्यांचा सत्कार २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आयोजित विशेष समारंभात करण्यात येणार आहे.

 

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी महाराष्ट्रात विशेषतः परभणी जिल्ह्यात ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. महिला उद्योजकांना प्रोत्साहन, लखपती दीदी योजना, ग्रामीण महिलांसाठी सिल्क अँड मिल्क उपक्रम, तसेच एकल महिला सशक्तीकरण अभियान यांसारख्या योजनांद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

 

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 

अमेरिका-भारत आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी कार्यरत असलेली यु.एस. इंडिया एसएमई कौन्सिल (U.S. India SME Council) ही संस्था लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे, नाविन्यपूर्ण उद्योजकता वाढविणे तसेच पायाभूत सुविधा, ऊर्जा, शाश्वत विकास, आरोग्य आणि ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी काम करते.

 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्था, तसेच नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles