spot_img
spot_img
spot_img

परभणीत 16 मार्चला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

परभणी, दि. 14 – समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या अडचणी आणि तक्रारी मांडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. सोमवार, दि. 16 मार्च 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा लोकशाही दिन पार पडणार आहे.

जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी, तर तालुकास्तरावर चौथ्या सोमवारी आयोजित केला जातो. या माध्यमातून पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळते, तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन व न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात.

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी, तर तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार असतात.
तरी जिल्ह्यातील महिलांनी त्यांच्या वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी विहीत नमुन्यात सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती एम. एस. रंधवे यांनी केले आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles