spot_img
spot_img
spot_img

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ आवश्यक – कुलगुरू प्रा.डॉ. इन्द्र मणि

जिल्हास्तरीय आंतर कृषि तंत्र विद्यालयीन क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

परभणी, दि. 13 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील आंतर कृषि तंत्र विद्यालयीन क्रीडा स्पर्धा 2026 उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ 10 मार्च 2026 रोजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू इंद्र मणि उपस्थित होते. त्यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, कृषि तंत्र विद्यालय परभणीचे प्राचार्य डॉ. संतोष पिल्लेवाड तसेच क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष श्रृंगारे उपस्थित होते.

कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्वांगीण विकासासाठी खेळ अत्यंत आवश्यक आहे. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, संघभावना, शिस्त, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वाढीस लागतो. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात कृषि तंत्र शिक्षणाचे महत्त्व वाढले असून विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करत शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही प्राविण्य मिळवावे. स्पर्धेमुळे जिंकण्याची जिद्द, पराभव स्वीकारण्याची तयारी आणि आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिकता विकसित होते, असेही त्यांनी नमूद केले.

उद्घाटन प्रसंगी डॉ. गजेंद्र लोंढे यांनी खेळाडूंनी खेळाडूवृत्ती जोपासून पंचांनी दिलेले निर्णय नम्रतेने स्वीकारावेत व क्रीडा स्पर्धा शांततेत पार पाडाव्यात, असे आवाहन केले. डॉ. संतोष पिल्लेवाड यांनी स्पर्धेचे प्रास्ताविक सादर केले.

या क्रीडा स्पर्धेत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील 10 कृषि तंत्र विद्यालयांतील सुमारे 300 खेळाडू, संघव्यवस्थापक व प्राचार्य सहभागी झाले होते. स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, रस्सीखेच या सांघिक खेळांसह धावणे, गोळाफेक, लांब उडी, संगीत खुर्ची, दोरीवरील उड्या व रांगोळी अशा वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेनंतर त्याच दिवशी पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गजेंद्र लोंढे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेश कदम व डॉ. संघर्ष श्रृंगारे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक खिल्लारी यांनी, तर आभार प्रदर्शन धीरेंद्र गोसावी यांनी केले. क्रीडा स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. संतोष पिल्लेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव टारफे, डॉ. शशिशेखर जावळे, डॉ. पी. पी. अंबिलवादे, हनुमान बनसोडे, कुंडलीक पांचाळ, विठ्ठल रणेर, श्री. सोनवणे, श्री. शिंदे, श्री. खराटे व अनिल गुरले यांनी परिश्रम घेतले.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles