spot_img
spot_img
spot_img

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर बनवस येथे संपन्न

पालम तालुक्यातील बनवस मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यात आला. जिवंत सातबारा, संजय गांधी विभागातील पात्र लाभार्थी तसेच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र तसेच शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. कृषी विभागाकडून ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले, तर पुरवठा विभागाकडून ई-शिधापत्रिका देण्यात आल्या. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विविध शासकीय योजनांची माहिती देऊन लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

या कार्यक्रमास तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार श्री. विनोद पवार, श्री. भागवत तेलभरे, श्री. दत्ता कटारे, श्रीमती शितल खडसे मॅडम, मंडळ अधिकारी शबाना मॅडम, राजकुमार चिकटे, ग्रामविकास अधिकारी सदानंद लटपटे, विनोद देगावकर, अरविंद डांगे, पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे, गटशिक्षणाधिकारी सुभाष आमले, तालुका कृषी अधिकारी गिरी सर, वैद्यकीय अधिकारी नरवटे सर, उपअधीक्षक भूमी अभिलेख के. आर. लोढे मॅडम आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच प्रिया राजू लांडगे यांनी भूषविले. तसेच कार्यक्रमास गावातील मान्यवर, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण रामराव सुरनर, जिल्हा परिषद सदस्य शांतीस्वरूप जाधव, ग्रामपंचायतमधील सर्व सदस्य व कर्मचारीवृंद, पोलीस पाटील, विविध सहकारी सोसायट्यांचे चेअरमन तसेच बनवस मंडळातील नागरिक, शाळेतील विद्यार्थी व शिक्षकवृंद, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

 

मा. तहसीलदार श्री. कैलासचंद्र वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बनवस येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles