spot_img
spot_img
spot_img

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 26 सप्टेंबर रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर* *पीक परिस्थितीची करणार पाहणी*

 

परभणी , दि. 25 : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ह्या शनिवार, दि. 26 सप्टेंबर 2026 रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या विविध गावातील टंचाईसदृश परिस्थिती व पीक परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि. 26 सप्टेंबर रोजी लोहा, जि. नांदेड येथून त्या मोटारीने सकाळी 10.30 वा. मरडसगाव ता. गंगाखेड येथे येतील व पीक परिस्थितीची पाहणी करतील. सकाळी 11.30 वा. दैठणा ता. परभणी येथे आगमन व पीक परिस्थिती पाहणी करतील. त्यानंतर दुपारी 1.00 वा. पाथरी येथे आगमन व पीक परिस्थितीच्या पाहणी करतील. दुपारी 1.30 वा. मोटारीने माजलगाव, जि. बीडकडे त्या प्रयाण करतील.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles