परभणी, प्रतिनिधी
परभणी (दि. ३० ऑगस्ट) – ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, शोषित, पीडित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना सातत्याने आवाज देणाऱ्या ‘रुरल एक्स्प्रेस’ च्या वर्धापन विशेषांकाचे विमोचन परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या शुभहस्ते शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले. पालम तालुक्यातील भूमिपुत्र संपादक प्रसाद सखाहरी पौळ यांनी गेली काही वर्षांपूर्वी ‘मासिक रुरल एक्स्प्रेस’ च्या माध्यमातून पत्रकारितेच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत त्यांनी ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी समाजातील सामान्य माणसाच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून पत्रकारितेची वाटचाल सुरू ठेवली. ग्रामीण भागातील वास्तव,शेतकऱ्यांच्या अडचणी, कष्टकऱ्यांचे प्रश्न, अन्याय- अत्याचार तसेच वंचित घटकांच्या समस्या प्रभावीपणे आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडत ‘रुरल एक्स्प्रेस’ ने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली. मासिकातून साप्ताहिकाकडे झालेला प्रवास हा केवळ प्रकाशनाचा विस्तार नसून, ग्रामीण जनतेच्या प्रश्नांना अधिक व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याच्या ध्येयाचा टप्पा ठरला. माहिती प्रसारण विभाग, दिल्ली मंत्रालयाची मान्यता प्राप्त करून ‘रुरल एक्स्प्रेस’ने साप्ताहिक स्वरूपात नवी झेप घेतली. दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी परभणी येथे साप्ताहिक ‘रुरल एक्स्प्रेस’ च्या प्रथम अंकाचे प्रकाशन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर वर्षभरात या साप्ताहिकाने सामाजिक बांधिलकीची भूमिका अधिक भक्कम केली.
याच यशस्वी वाटचालीचा गौरव म्हणून वर्धापन विशेषांकाचे विमोचन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ‘रुरल एक्स्प्रेस’च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना निर्भीडपणे व्यासपीठ देण्याचे कार्य सातत्याने सुरू राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत ‘रुरल एक्स्प्रेस’ चे संपादक प्रसाद पौळ यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. ‘ग्रामीण भागाचा बुलंद आवाज, जनतेचा विश्वास’ ही भूमिका घेऊन सुरू झालेल्या ‘ रुरल एक्स्प्रेस’ च्या प्रवासाने आता वर्धापन वर्षात प्रवेश केला. असून, ग्रामीण पत्रकारितेच्या क्षेत्रात सामान्यांच्या हक्कासाठी लेखणी चालविणारे संपादक प्रसाद पौळ या भूमिपुत्राच्या संघर्षमय वाटचालीला नवी दिशा मिळाली. अशाप्रकारे मंगलमय वातावरणामध्ये रूरल एक्सप्रेसचा वर्धापन दिन मोठ्या हर्षउल्हासात संपन्न झाला.











Total Users : 254744