पालम – पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे रक्षण आणि शहरांचे हरितीकरण या उद्देशाने नगर पंचायत पालमच्या वतीने ‘देववन घणवण’ वृक्षलागवड प्रकल्प राबविण्यात आला. राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या निर्देशानुसार व आ. रत्नाकर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली, परिवर्तन फाउंडेशनच्या तांत्रिक सहकार्याने गंगाखेड रोडवरील स्मशानभूमी परिसरातील सुमारे 12 गुंठे क्षेत्रावर मियावाकी पद्धतीने विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. अल्प क्षेत्रात घनदाट जंगल निर्माण करण्याच्या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या कार्यक्रमास नगरपंचायत पालमचे नगराध्यक्ष प्रतिनिधी जियाउल्लाखा पठाण, मुख्याधिकारी युवराज पौळ, उपनगराध्यक्ष भास्करराव सिरस्कर, गटनेते उबेदुल्लाखा पठाण,शेपभाई चाऊस,नगरसेवक प्रतिनिधी ज्ञानराज घोरपडे,अजीमखा पठाण तसेच इतर सन्माननीय सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन कार्यालयाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपसिंग बयास, राज्य कार्यक्रम व्यवस्थापक ज्योती ठाकूर, अभियान सहयोगी सचिन कदम, प्रीती फुलझेले, जिल्हा कार्यक्रम समन्वयक किरण बिलोरे, प्रकल्प समन्वयक सतीश खंदारे, महेश तळेकर, बाळू कोलगे, अमोल कुटे, रवींद्र वाघमारे यांच्यासह नगरपंचायत पालमचे अधिकारी, कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. पालम शहर अधिक हिरवेगार, स्वच्छ व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेला ‘देववन घणवण’ हा उपक्रम भविष्यात प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.











Total Users : 254692