परभणी (जि. प्र.) : हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाचे प्रमुख प्रा. दयानंद मस्के यांचा हिंगोलीहून परळीकडे जात असताना परभणीत आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे मुख्यप्रवर्तक मा. पांडुरंग रणखांब यांच्या हस्ते प्रा. मस्के यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास लाल सेनेचे संस्थापक अध्यक्ष काँ. गणपत भिसे, सरपंच दिगंबर भिसे, लाल सेनेचे जिल्हाध्यक्ष एल. डी. कदम, पत्रकार सलीम इनामदार, पत्रकार बालाजी काळे, बाबासाहेब भालेराव, नवनाथ पवार, बंटी भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. दयानंद मस्के, काँ. गणपत भिसे तसेच पांडुरंग रणखांब यांनी समयोचित मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाजप शक्ती केंद्र प्रमुख दीपक गवारे यांनी केले.











Total Users : 254687