spot_img
spot_img
spot_img

पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध…! ताडकळस मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी.

 

ताडकळस (दि.२७ जून) –
पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणारे वक्तव्य करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात मराठी पत्रकार संघ ताडकळसच्या वतीने दि.२६ जून २०२६ वार सुक्रवार रोजी ताडकळस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्याचे कार्य करतात. अशा परिस्थितीत पत्रकारांना धमकावणे, त्यांच्यावर दबाव आणणे अथवा जीवे मारण्याची धमकी देणे हे अत्यंत गंभीर व निषेधार्ह कृत्य आहे. अशा प्रकारच्या धमक्यांमुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा येण्याची शक्यता निर्माण होते. मराठी पत्रकार संघ ताडकळसच्या वतीने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी मराठी पत्रकार संघ ताडकळसचे अध्यक्ष देवानंद नावकिकर, सचिव मदनराव आंबोरे, मार्गदर्शक शिवाजी शिराळे, लक्ष्मीकांत स्वामी जवळेकर, सल्लगार धम्मपाल हनवते, कोषाध्यक्ष बाळासाहेब राऊत, सहसचिव सचिन सोनकांबळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles