spot_img
spot_img
spot_img

पी. एम. किसान हप्त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 जून रोजी वितरण कार्यक्रमाचे होणार थेट प्रक्षेपन; 20 जून पी.एम. किसान दिवस

 

परभणी, दि. १९ — प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा माहे एप्रिल 2026 ते जूलै 2026 कालावधीतील 23 वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार, दि. 20 जून, 2026 रोजी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्हयातील तारकेश्वर येथुन वितरीत होणार आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून केंद्र शासनाने दिनांक 20 जून, 2026 हा दिवस संपूर्ण देशभर पी.एम. किसान उत्सव दिवस म्हणुन साजरा करण्याचे ठरविले आहे.

 

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम किसान) योजना माहे फेब्रुवारी, 2029 पासुन सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती- पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रु 6000/- त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे पी. एम किसान योजने अंतर्गत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापुर्वी एकुण 22 हप्त्यांमध्ये सुमारे 41083.00 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम किसान) योजनेच्या लाभासाठी केंद्र शासनाकडुन लाभार्थीन भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे, व ई-केवायसी प्रमाणिकरण करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. राज्यातील सद्यस्थितीत या तीनही बाबीची पूर्तता केलेल्या एकूण 90.85 लाख शेतकरी कुटुंबांना दिनांक 20 जून, 2026 रोजी सुमारे रक्कम रुपये 1817.00 कोटी इतक्या रक्कमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाव्दारे जमा होणार आहे.पी एम किसान योजनेच्या लाभासाठी लाभार्थीकडे फार्मर आय डी असणे देखील केंद्र शासनाने क्रमप्राप्त केले आहे राज्यातील कृषि विज्ञान केंद्र तसेच जिल्हा, तालुका व ग्राम पंचायत स्तरावर, कृषि उत्पन्न बाजार समिती, विविध कार्यालये, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघटना, सहकारी पतसंस्था या ठिकाणी सदरचा समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. नागरी सुविधा केंद्रांवरुनही या संमारभाच्या थेट प्रक्षेपणामध्ये सहभागी होता येईल,

 

राज्यांमध्ये सर्वदूर कृषि विभाग, महसुल व वन विभाग, तसेच ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त् विद्यमाने सदरचा समारोह साजरा करण्यात येणार आहे. सदरच्या समारोहाचे थेट प्रक्षेपण केंद्र शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in या लिंक वरुन होणार आहे. सदरच्या लिंकचा वापर करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बंधु भगिनींना या समारोहामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दौलत सुदाम चव्हाण यांनी केले आहे. तसेच या योजनेबाबत अधिक माहितीसाठी सबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles