spot_img
spot_img
spot_img

पत्रकार सुरक्षा समितीचा यल्गार पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोलमधून सूट मिळणे बाबत रविवारी धरणे आंदोलन* अनेक पत्रकारांची उपस्थिती

सोलापूर (प्रतिनिधी) पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याच बरोबर प्रशासना च्या बातम्या करण्यासाठी तालुका व विविध ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी कधी दुचाकी तर कधी चारचाकी वाहनातून प्रवास करावा लागतो जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यायल जिल्हा परिषद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळाचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तसेच आमदार खासदार कॅबिनेटमंत्री राज्यमंत्री यांचे दौरे नियोजन बैठका सभा मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्ताकंन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी चारचाकी वाहनाने यावं लागत आहे ग्रामीण भागातील काही पत्रकारांकडे चारचाकी वाहन असल्याने नेहमीच सोलापूर ला वृत्त संकलन करण्यासाठी टोल भरून यावं लागतं आहे शासकीय वृत्तसंकलन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकार बांधव रोजच जिल्ह्याच्या ठिकाणी येत असल्याने टोल चा आर्थिक भुर्दंड पत्रकार बांधवाना सहन करावा लागत आहे याबाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने दिनांक १६/७/२०२५ रोजी सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट मिळणे बाबत पत्रकार सुरक्षा समितीने विभागीय आयुक्त पुणे यांची दिनांक 12/9/2025 रोजी भेट घेऊन टोल मधून सूट मिळणे बाबत निवेदन सादर करून टोल मुक्तीची मागणी लावून धरली होती पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट मिळणे बाबत अद्याप योग्य तो निर्णय न झालेने अखेर पत्रकार सुरक्षा समितीने आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला असून पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट मिळणे बाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रविवार दिनांक 17/5/2026 रोजी जिल्हा परिषद (पूनम गेट ) या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले
*कोण म्हणतंय देत नाही घेतल्या शिवाय राहात नाही*
*आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा*
*पत्रकार सुरक्षा समितीचा विजय असो*
अश्या घोषणांनी जिल्हा परिषद दाणाणून सोडण्यात आला.
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी पत्रकारांच्या चारचाकी वाहनास राज्य सरकार ने टोलमधून लवकरात लवकर सूट द्यावी अन्यथा आझाद मैदान मुबंई येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अमित राठोड सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी शहर कार्यकारी अध्यक्ष वसीमराजा बागवान कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव रमेश दग्गारी प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप जनता संघर्ष न्यूज चे संपादक सिद्धार्थ भडकुंबे विष्णू सकट संदीप धोत्रे परमेश्वर आटीपामूल श्रीनिवास पेद्दी रमेश अपराध गणेश निंबाळकर इत्यादी पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles