spot_img
spot_img
spot_img

कात्नेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न*  

 

 

परभणी दि. 10 : कात्नेश्वर येथे आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न झाले.

यावेळी लाभार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवाशी प्रमाणपत्र, मनरेगाची विहीर, सहमतीपत्र, कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत वाहनांच्या चावी आणि प्रमाणपत्र, आरोग्य विभागाचे आयुष्यमान कार्ड, संजय गांधी निराधार प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी कृषी विभाग, पशुसंवर्धन, उमेद अभियान, महिला व बालविकास, आरोग्य, भूमी अभिलेख, पुरवठा विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते.

 

शिबीरास जिल्हा परिषद सदस्य रितेश काळे, पूर्णा पंचायत समिती उप सभापती काशिनाथ काळबांडे, पंचायत समिती सदस्य तथा सरपंच कान्होपात्रा चापके, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, गटविकास अधिकारी नारायण मिसाळ, तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव, आरोग्य अधिकारी सुरेश गिणगीने, पुरवठा निरीक्षक श्री. नाईक, उप अधीक्षक भूमी अभिलेख अनिल शिरढोणकर, मंडळ अधिकारी सुदाम खुणे, श्री. वाघमोडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles