spot_img
spot_img
spot_img

जयंतीनिमित्त गंगाखेड नगर परिषदेकडून पुतळा परिसराची पाहणी

 

 

गंगाखेड (प्रतिनिधी) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड येथील पूर्णाकृती पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाची नगर परिषदेकडून गुरुवार, ९ एप्रिल रोजी पाहणी करण्यात आली.

 

या पाहणीवेळी नगर परिषद गटनेते ॲड. मिथिलेश केंद्रे, कार्यालयीन अधीक्षक नागनाथ साळवे, नगरसेवक चंद्रकांत खंदारे, नगरसेवक साबेर शेख, सामाजिक कार्यकर्ते सुरेश साळवे, सुरेश पारवे, आतीश खंदारे तसेच संबंधित अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.

 

पुतळा परिसरातील कंपाउंड भिंत, रंगरंगोटी, प्रकाश व्यवस्था, उपासकांसाठी बसण्याची सोय तसेच पिण्याच्या पाण्याच्या सुविधांची सविस्तर पाहणी करण्यात आली. यावेळी ॲड. मिथिलेश केंद्रे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

 

तसेच, डॉ. आंबेडकर चौकातील बराच काळ बंद असलेला हायमास्ट लाईट सुरू करण्याबाबत अभियंता आगलावे यांना निर्देश देण्यात आले. जयंतीनिमित्त नागरिकांना सर्व सुविधा सुरळीतपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगर परिषदेकडून विशेष तयारी सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

 

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles