परभणी, दि. 24 : भारतीय लोकशाही प्रक्रियेचा कणा मानल्या जाणाऱ्या मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या वतीने “मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम” हाती घेण्यात आला आहे. लवकरच म्हेणजेच माहे एप्रिल २०२६ मध्ये् महाराष्ट्रापत देखील हा कार्यक्रम सुरु होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासन सज्ज असून परभणी जिल्हयातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे व मतदार यादीत आपले नाव तपासून आवश्यक दुरुस्ती करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार व पत्रकार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, हा कार्यक्रम केवळ नोंदणीपुरता मर्यादित नसून, स्वच्छ, पारदर्शक आणि विश्वासार्ह निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होणे ही काळाची गरज आहे. मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे मतदार यादीचे शुद्धीकरण आहे. या कार्यक्रमातंर्गत दुबार नावे, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नोंद वगळून तसेच अपूर्ण किंवा अस्पष्ट छायाचित्रे दुरुस्त करून पात्र नागरिकांची नावे समाविष्ट केली जाणार आहेत. एकही पात्र मतदार वंचित राहू नये आणि एकही अपात्र नाव यादीत राहू नये,” हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये. स्वतः पुढाकार घेऊन मतदार यादीत आपले नाव तपासावे व आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाकरीता मतदारांची मॅपींग ज्या्मध्येक सन २००२ च्याख अंतिम मतदार यादीतील मतदारांचे सन २०२५ च्याी मतदार यादीतील मतदारांशी मॅपिंग करणे, तसेच सन २००२ च्याय मतदार यादीमध्येत नाव नसलेल्या५ मतदारांचे त्यांतच्याम आई-वडील, वडीलांकडील आजी-अजोबा यांचेशी ऑनलाईन बि.एल.ओ. अॅपमध्येा मॅपिंग करण्यायची कार्यवाही चालु असून आज रोजी परभणी जिल्ह्याातील मॅपिंगचे काम ६६.०५ टक्केॅ झालेले आहे. सदर कामामध्येक परभणी जिल्हा राज्यालमध्येा आठव्याक क्रमांकावर आहे. तर जिल्हयामध्येम पाथरी उपविभाग प्रथम क्रमांकावर असुन सोनपेठ तहसिलचे सर्वात जास्त म्हयणजेच ७८.०० टक्केव काम झालेले आहे.
मुख्यग निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्यप यांच्याकडून प्राप्त निर्देशाचे अनुषंगाने सध्या सुरु असलेल्या. पूर्व तयारीचा आढावा घेण्याकसाठी तसेच पुर्व तयारीसाठी करावयाच्याय कामा संदर्भात जिल्ह्या तील ४ मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, ९ सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी, सर्व मुख्यातधिकारी, सर्व गटशिक्षण अधिकारी, ९ निवडणूक नायब तहसिलदार, १६३ बीएलओ यांचे पर्यवेक्षक यांचे जिल्हादस्तकरावर तीन प्रशिक्षणे झालेली आहेत. त्या,च प्रमाणे १६२३ बीएलओ (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) यांना तहसिल स्त रावर प्रशिक्षण देण्याित आले आहे.
मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाकरीता मतदारांची मॅपींग करण्याकच्याि अनुषंगाने सर्व राजकीय पक्षाच्याी जिल्हारध्यकक्ष / पदाधिकारी यांची बैठक घेवुन जिल्हयातील १६२३ मतदान केंद्रावर मतदान केद्रस्त२रीय प्रतिनिधी (बीएलए) यांच्यार नेमणुका करण्याकबाबत सुचना देण्याहत आल्याल आहेत.
त्यािचप्रमाणे मतदार यादीमध्यें असलेल्याु दुबार मतदार, यादीतील अस्पष्टय व मानवी नसलेल्याद छायाचित्रांची पडताळणीबाबत करावयाची कार्यवाही ऑनलाईन पध्दातीने प्रात्या क्षिकाव्दा,रे दाखविण्या्त आली. मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण करणेकरीता १२०० पेक्षा जास्त मतदार एका मतदान केंद्राला जोडले जाणार नाही, याबाबत दक्षता घेऊन सुसुत्रिकरणाचे प्रस्ता०वत तयार करण्यााबाबत सुचना देण्याेत आल्याा.
भारत निवडणूक आयोगाने बीएलओ अॅपमध्ये् मतदारांना त्यांयच्यााशी संबंधित बीएलओ यांना कॉल करण्या ची सुविधा उपलब्धआ करुन दिली असून कॉल बुक झाल्याानंतर कॉल बुक केलेल्याी अर्जदारास संपर्क साधून प्रतिसाद देण्याकरीता कॉल बॅक करण्याूची कार्यपध्द्त उपलब्धक करुन देण्या्त आली आहे.
आगामी मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाकरीता (SIR) करीता मोठ्या प्रमाणात कर्मचा-यांच्यास नियुक्त्यार कराव्याप लागणार असून ज्यायमध्ये् बीएलओ यांना सहाय्य करण्याआसाठी गाव पातळीवरील कर्मचारी, सर्व कार्यालयातील संगणक ऑपरेटर व इतर कर्मचारी लागणार असल्यांने सदरील कर्मचारी यांच्या् नियुक्त्या करुन करण्यालत येणार असल्या चे जिल्हााधिकारी यांनी सांगितले. सर्व राजकीय पक्षांनी १६२३ मतदान केंद्रावर मतदान केद्रस्ततरीय प्रतिनिधी (बीएलए) यांच्याि नेमणुका करण्यायबाबत त्यांनी आवाहन केले. त्यानचप्रमाणे प्रत्येेक मतदाराने जागरुक राहून आपले नावाचे मॅपींग करुन घेण्याबाबत आवाहन केले.
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराची नोंद अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून आपला मतदानाचा अधिकार सुनिश्चित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
तर श्रीमती अरुणा संगेवार यांनी उपस्थितांना सर्व मतदारांनी त्यांनचे २००२ च्याच मतदार यादीतील नावे पहाण्यामसाठी https://w.w.w.eci.gov.in/voters-services-portal या संकेतस्थणळाचा वापर करण्याेबाबत आवाहन केले. त्याhचप्रमाणे काही अडचण आल्याtस आपल्याr परिसरातील बीएलओ यांना संपर्क करावा अथवा संबधीत तहसिल कार्यालयास संपर्क करण्यामबाबत आवाहन केले.






