परभणी, दि. 13 – राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे व सदस्य सुभाष राऊत हे दि. 16 ते 18 मार्च 2026 या कालावधीत परभणी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
दिनांक 16 मार्च रोजी सकाळी 11.30 वा. मुंबई येथून परभणी येथे आगमन, शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. दुपारी 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांचे समवेत नियतन, उचल व वाटपाचा आढावा.
दु. 12.00 जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिक्षणाधिकारी प्राथमिक व प्रशासकीय अधिकारी शालेय पोषण आहार यांचे समवेत शालेय पोषण आहार योजने अंतर्गत नियतन, उचल व वाटपाचा आढावा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा बाल रोग तज्ञ व मनपा बाल रोग तज्ञ यांचे समवेत कुपोषीत बालकांबाबत आढावा. दुपारी 1.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा कार्यक्रम अधिकारी व प्रकल्प अधिकारी शहरी व ग्रामीण यांचे समवेत महिला व बाल विकास सेवा योजने अंतर्गत नियतन, उचल व वाटपाचा आढावा, दुपारी 2.30 वा. जिल्हयातील तृतीयपंथी संघटना, भीकमुक्ती संदर्भीय काम करण्या-या संघटना, वेश्याव्यवसायीक यांच्याशी संलग्न संघटना, पोषण आहार अंतर्गत बचतगट, आयसीडीएस अंतर्गत बचतगट, गलीच्छ वस्तींना भेटी, शासकीय धान्य गोदाम, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामे, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी तसेच केंद्रीय स्वयंपाकगृह, शाळा, अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकानांना भेटी. सायंकाळी 6.00 वा. शासकीय विश्रामगृहाकडे रवाना व मुक्काम
दि. 17 मार्च रोजी सकाळी 10.30 ते 6.00 पर्यंत शासकीय धान्य गोदाम, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामे, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी, पोषण आहार व आयसीडीएस अंतर्गत बचतगट यांना भेटी तसेच केंद्रीय स्वयंपाक गृह, शाळा, अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकानांना भेटी.
दि. 18 मार्च 2026 रोजी शासकीय धान्य गोदाम, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदाने, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी, शालेय पोषण आहार व आयसीडीएस अंतर्गत बचतगट यांना भेटी तसेच केंद्रीय स्वयंपाक गृह, शाळा, अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकानांना भेटी. सायंकाळी 7.00 वा. वाहनाने परभणी येथून मुंबईकडे रवाना.






