spot_img
spot_img
spot_img

मराठवाड्यात गंगाखेड उपविभाग संगणकीकरणात अव्वल मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) अंतर्गत 68.33 टक्के संगणकीकरण पूर्ण

 

परभणी, दि. 17 जुलै : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादीच्या संगणकीकरणाच्या कामात परभणी जिल्ह्यातील गंगाखेड उपविभागाने मराठवाड्यातील सर्व उपविभागांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

गंगाखेड उपविभागाने 68.33 टक्के संगणकीकरण पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली असून ही प्रगती नियोजनबद्ध कार्यपद्धती, प्रभावी समन्वय आणि क्षेत्रीय यंत्रणेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित मानली जात आहे.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात एकूण 4,17,481 मतदार असून या कामासाठी 432 बीएलओ कार्यरत आहेत. सर्व 432 बीएलओंना शंभर टक्के प्रशिक्षण देण्यात आले असून 4,12,888 (98.90%) मतदारांचे फॉर्म वितरित करण्यात आले आहेत. त्यापैकी 2,85,259 मतदारांचे (68.33%) संगणकीकरण पूर्ण झाले असून 2,85,175 मतदारांचे (68.31%) पडताळणीचे कामही पूर्ण झाले आहे. केवळ 79 प्रकरणे (0.02%) बीएलओ पडताळणीसाठी प्रलंबित असून 5 फॉर्म ईआरओ स्तरावर प्रलंबित आहेत. तसेच 5,293 DSE (1.27%), 5,310 न स्वीकारता येणारे फॉर्म (1.27%) आणि 29,687 विसंगती (7.11%) नोंदविण्यात आल्या आहेत.

या उल्लेखनीय यशामागे गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी जीवराज डापकर यांचे प्रभावी नेतृत्व, सातत्यपूर्ण आढावा, काटेकोर नियोजन आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी समन्वय महत्त्वाचा ठरला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी, तलाठी, बीएलओ आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी अत्यंत वेगाने व अचूकतेने संगणकीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली.

जिल्हा प्रशासनाने गंगाखेड उपविभागाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून उर्वरित कामही याच गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गंगाखेड उपविभागाची ही कामगिरी इतर उपविभागांसाठी प्रेरणादायी ठरत असून विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles