spot_img
spot_img
spot_img

नवनिर्वाचित संचालक तुषार भैय्या गोळेगावकर यांचा सत्कार उत्साहात

 

 

पालम | प्रतिनिधी

 

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तुषार भैय्या गोळेगावकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल पालम येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

पालम-पेठ पिंपळगाव रोडवरील मोरया फंक्शन हॉल हॉटेल येथे आयोजित सत्कार समारंभात आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे पदाधिकारी, पंचायत समितीचे सभापती, नगरपंचायतीचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी उपस्थितांनी तुषार भैय्या गोळेगावकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपस्थितांनी त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles