गंगाखेड,दि.26 —“माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गंगाखेड पंचायत समितीच्यावतीने तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात पार पडली.
या वेळी पंचायत समितीचे सभापती मनोज लक्ष्मणराव मुंडे यांनी सर्व गावांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. गंगाखेड तालुक्याची कामगिरी जिल्हा व राज्य स्तरावर उल्लेखनीय व्हावी, यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक गटविकास अधिकारी जयराम मोडके होते. उपसभापती सारिका खांडेकर, पंचायत समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोजकुमार दीक्षित यांनी प्रास्ताविकात अभियानाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, ग्रामीण भागातील आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढविणे, प्रतिबंधात्मक उपायांना चालना देणे आणि ग्रामस्तरावर जनसहभाग वाढविणे यावर भर दिला जाणार आहे. यासाठी ठोस कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी केली जाणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भरत भोसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री कळसाईतकर यांनी केले.
ही कार्यशाळा तालुक्यातील आरोग्य यंत्रणा, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे यशस्वी ठरली.
कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य प्रतापराव कदम, शरदराव काळे, समाधान चिलगर, बन्सीधर मुलगीर, गणेश माने, विजय मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोजकुमार दीक्षित, वैद्यकिय अधिकारी डॉ.आलीम, डॉ .मुंडे, डॉ भोसले, डॉ.शिंदे,डॉ. खिचडे डॉ. जुनेद,क्षयरोग विभागाचे डॉ. प्रसाद केंद्रेकर, व विस्तार अधिकारी भारत नरवाडे, विनोद डोंगरजकर आदीची प्रमुख उपस्थिती होती.











Total Users : 254687