पालम. प्रतिनिधी
तालुक्यातील विविध महत्त्वाच्या समित्यांवर निवड झालेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पालम तहसील कार्यालयात तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये संजय गांधी निराधार समिती, पंचायत समिती आणि बांधकाम कामगार संनियंत्रण समितीच्या नवनियुक्त अध्यक्षांचा व सदस्यांचा समावेश होता.
यांचा झाला सत्कार
संजय गांधी निराधार समितीच्या पालम तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल,शेख गौस भाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब ढोले आणि बांधकाम कामगार संनियंत्रण समितीच्या विधानसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ॲड. राहुल शिंदे, यांचाही प्रशासनाच्या वतीने गौरव करण्यात आला.
लाभार्थ्यांना न्याय देणार: शेख गौस
सत्कारानंतर बोलताना संजय गांधी निराधार योजनेचे नवनियुक्त अध्यक्ष शेख गौस भाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, “शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हे माझे मुख्य ध्येय आहे. पदभार स्वीकारताच कामाला सुरुवात केली असून, पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय न्याय देण्याचे काम प्राधान्याने केले जाईल.”
मान्यवरांची उपस्थिती
या सत्कार समारंभास नायब तहसीलदार बी. एम. तेलभरे, पत्रकार,शांतीलाल शर्मा, तहसीलचे वाहन चालक इफत पठाण, कर्मचारी मारोती पुणे यांच्यासह तहसील कार्यालयातील इतर कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. सर्वच स्तरांतून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहेत











Total Users : 254687