ताडकळस / प्रतिनिधी
ताडकळस (दि. ०९ एप्रिल) – पुर्णा तालुक्यातील मौ. शिरकळस येथील भूमिपुत्र तसेच दैनिक क्रांतीशस्त्रचे संपादक धम्मपालजी हानवते यांच्या वाढदिवसानिमित्त ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांच्या वतीने धम्मपालजी हानवते यांना पुष्पगुच्छ देऊन पेढे भरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. सदरील या कार्यक्रमास पत्रकार सुरक्षा समितीचे परभणी जिल्हाध्यक्ष प्रसाद पौळ पाटील, पत्रकार गजानन नाईकवाडे, मराठी पत्रकार संघाचे ताडकळस अध्यक्ष देवानंद नावकीकर, पत्रकार जनार्धन आवरगंड, पत्रकार सचिन सोनकांबळे, पत्रकार बाळासाहेब राऊत याच्यासह आदीं उपस्थित होते.या प्रसंगी उपस्थितांनी हानवते यांच्या सामाजिक व पत्रकारितेतील कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.











Total Users : 254689