spot_img
spot_img
spot_img

पालम तालुक्यात आरपीएलआय (RPLI) विमा दाव्याचे ३.२० लाख रुपये वारसाला सुपूर्द; केवळ एक हप्ता भरला असताना मिळाला आर्थिक आधार

 

पालम /प्रतिनिधी रुरल एक्स्प्रेस

तालुक्यातील जवळा येथील रहिवासी दिवंगत सिद्धार्थ नरहरी वावळे यांच्या वारसदार पत्नी शीतल सिद्धार्थ वावळे यांना ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (RPLI) अंतर्गत ३ लाख २० हजार ६५८ रुपयांचा विमा दावा मंजूर करून त्याचा धनादेश डाक विभागामार्फत सुपूर्द करण्यात आला आहे.

१४ सप्टेंबर २०२५ रोजी काम करत असताना शॉक लागून सिद्धार्थ वावळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी त्यांनी फरकंडा पोस्ट कार्यालयामार्फत पोस्टल लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती. या पॉलिसीचा वार्षिक प्रीमियम ३७ हजार ५४५ रुपये असून, अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे केवळ एकच हप्ता भरला असताना त्यांचे निधन झाले. मात्र, डाक विभागाने तत्परता दाखवत पूर्ण विम्याची रक्कम मंजूर करून वावळे कुटुंबाला मोठा दिलासा दिला.

परभणी डाकघर विभागाचे अधीक्षक श्री सतीश पाठक साहेब व सहाय्यक डाक अधीक्षक, श्री गणेश देशमाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा धनादेश वारसांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी पालमचे एसपीएम श्री. गिरी, MO श्री नितीन साळवे आणि एमटीएस शिवाजीराव शिंदे यांच्यासह डाक विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हा विमा दावा वेळेत मंजूर व्हावा यासाठी फरकंडा येथील पोस्टमास्तर रंगनाथ शिंदे यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत व प्रक्रिया जलद गतीने करून विशेष सहकार्य केले. त्यांच्या या सहकार्यामुळेच वावळे कुटुंबाला विम्याची रक्कम मिळण्यास मदत झाली. या संकटसमयी मदतीचा हात मिळाल्याबद्दल वावळे कुटुंबाने फरकंडा पोस्टमास्तर शिंदे व डाक विभागाचे मनापासून आभार मानले

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles