spot_img
spot_img
spot_img

पालम तालुक्यात SIR मोहिमेची वेगवान घोडदौड; 94.71 टक्के काम पूर्ण 8 ऑगस्टपर्यंत गणना फॉर्म भरण्याचे तहसीलदारांचे आवाहन; 5,080 मतदारांचे फॉर्म अद्याप बाकी

 

पालम : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अभियानात पालम तालुक्याने वेगवान प्रगती नोंदवली असून आतापर्यंत 94.71 टक्के काम पूर्ण झाले आहे. तालुक्यातील 96 हजार 88 मतदारांपैकी 91 हजार 8 मतदारांचे Enumeration Form (EF) भरून घेण्यात आले असून 5 हजार 80 मतदारांचे फॉर्म अद्याप भरणे बाकी आहेत.
मतदार यादी पुनरीक्षणासाठी पूर्वी 29 जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, मुख्य निवडणूक आयोगाने ती वाढवून 8 ऑगस्ट 2026 पर्यंत केली आहे. त्यामुळे अद्याप फॉर्म न भरलेल्या मतदारांना आणखी संधी उपलब्ध झाली आहे.
SIR अभियानासाठी तालुक्यात 10 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (AERO), 10 पर्यवेक्षक तसेच 105 बीएलओ व बीएलओ सहाय्यक कार्यरत असून घरोघरी जाऊन मतदारांचे फॉर्म भरून घेण्याचे काम सुरू आहे.
या प्रक्रियेनंतर 17 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार असून त्यावरील सुनावणी व कार्यवाही पूर्ण करून 19 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दरम्यान, ज्या मतदारांनी अद्याप SIR गणना फॉर्म भरलेला नाही, त्यांनी 8 ऑगस्टपूर्वी संबंधित बीएलओकडे फॉर्म भरून जमा करावा, असे आवाहन तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी केले आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles