spot_img
spot_img
spot_img

प्रशासनाकडून 32 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वाटप.

 

 

पालम – शहरात पारंपरिक जीवन जगणाऱ्या पारधी जमातीच्या लोकांची मोठी संख्या आहे. पण त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत जात प्रमाणपत्र अभावामुळे अडचण येत होती. या संदर्भात माधवराव पाटील महाविद्यालयाने पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळून देण्यात मोठी मदत केली.

गंगाखेड येथील उपविभागीय कार्यालयात उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर आणि पालम चे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांच्या हस्ते महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. याशिवाय महाविद्यालयाबाहेरील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव महाविद्यालयाच्या माध्यमातून दाखल करण्यात आले होते त्यांनाही प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम आरसुळे यांच्या सहकार्यातून डॉ. वर्षा दाभाडे यांनी परिश्रम घेतले. त्यांना महसूल विभागातील नायब तहसीलदार विनोद पवार आणि गाडे यांनी मदत केली.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles