सोलापूर (प्रतिनिधी )
गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार हे महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनाला टोल मधून मुक्ती ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर पूरक व्यवसाय करता यावा म्हणून पाच लाख रुपयांचे कर्ज मिळणे त्याच बरोबर पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार अत्यंत प्रभावी पणे काम करत असून राज्यातील पत्रकारांचे अनेक विषय राज्यसरकार कडे पाठपुरावा करून सोडवण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी पत्रकारांना पाच लाख रुपयांचे विना जामीन कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सोलापूर चे जिल्हाधिकारी त्याच बरोबर विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला असून पत्रकारांना पाच लाख रुपये कर्ज बाबत विभागीय आयुक्त पुणे यांनी मा उद्योग संचालनालय मुबंई यांना पत्र देऊन यशवंत पवार यांच्या मागणीचा विचार कारून योग्य ती कार्यवाही करण्याचे कळवले आहे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार हे नुकतेच अक्कलकोट येथे वटवृक्ष स्वामी समर्थ येथे दर्शनाला गेले असता वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान चे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते यशवंत पवार यांचा स्वामी कृपावस्त्र व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना महेश इंगळे म्हणाले की यशवंत पवार हे महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी कायम संघर्ष करत असून पत्रकारांसाठी झटणारा माणूस म्हूणन राज्यात आगळी वेगळी ओळख यशवंत पवार यांनी निर्माण केली आहे यशवंत पवार यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस स्वामी समर्थ देवस्थान चे अध्यक्ष महेश इंगळे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी उपस्थित होते.






