spot_img
spot_img
spot_img

पत्रकार सुरक्षा समिती सांगोला तालुका कार्यकारणी जाहीर, तालुका अध्यक्ष पदी बबन चव्हाण तर सचिव पदी कुलदीप ओव्हाळ

 

सांगोला (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती ची सांगोला येथील दैनिक तुफान क्रांती कार्यालयात बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्ष स्थानी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार होते
या बैठकीत पत्रकारांच्या विविध विषयावर विविध विषयावर चर्चा करण्यात आली

गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनाला टोल मधून मुक्ती ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर पूरक व्यवसाय करता यावा म्हणून पाच लाख रुपयांचे कर्ज मिळणे त्याच बरोबर पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती अत्यंत प्रभावी पणे काम करत असून पत्रकार सुरक्षा समिती सांगोला तालुका ची नूतन कार्यकारणी पश्चिम महाराष्ट्र संघटक मिर्झा गालिब मुजावर यांनी जाहीर केली
सांगोला तालुका अध्यक्ष – बबन चव्हाण
सचिव – कुलदीप ओव्हाळ
जिल्हा उपाध्यक्ष – राजू बाबर
कार्याध्यक्ष -हणमंत सरगर
उपाध्यक्ष -शशिकांत हातेकर
उपाध्यक्ष -कैलास हिप्परकर
सह सचिव -नामदेव चव्हाण
प्रसिद्धी प्रमुख -धोंडिराम कांबळे
संपर्क प्रमुख -तन्वीर मुजावर
जावेद आत्तार -सदस्य
गुलचंद भोरे -सदस्य इत्यादी नूतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली तसेच नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी उपस्थित होते.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles