पालम(प्रतिनिधी) ग्राहकांनी बाजारातून वस्तू खरेदी करताना अथवा सेवा मिळवताना आर्थिक शोषण होत असेल तर त्याविरुद्ध तक्रार करते व्हावे असे आव्हान अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी जिल्हा उपाध्यक्ष भगवान करंजे यांनी पालम तहसील कार्यालय अंतर्गत पुरवठा विभागाच्या वतीने 15 मार्च जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जनजागरण पंधरवाडा कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना आव्हान केले.
दिनांक 30 मार्च 2026 सोमवार रोजी पालम तहसील कार्यालयाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार शितल खडसे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे परभणी जिल्हा उपाध्यक्ष भगवान करंजे प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पालम तालुका अध्यक्ष मोतीराम शिंदे शहराध्यक्ष धोंडीराम कळंबे अखिल भारतीय ग्राहक पंचायत पालम तालुका कार्यकारणीतील उत्तमराव भस्के, प्रा माधवराव बैकरे, सोशल मीडिया तालुकाप्रमुख राम गावंडे, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पालम तालुका अध्यक्ष मारुती नाईकवाडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या शुभ हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पालम तहसील पुरवठा विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थित ग्राहकांसमोर मार्गदर्शन करताना पुढे भगवान करंजे म्हणाले की, आपल्या भारत देशावर पोर्तुगीज ,इंग्रज आणि निजामानी सत्ता गाजवली त्यामुळे आपण गुलामीत जीवन जगलो आहोत.
देशाला स्वातंत्र्य 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले तरी पण आपण गुलाम म्हणून जगतो अन्याय विरुद्ध पेटून उठत नाहीत हे खेदाने नमूद करावे वाटते.
यापुढे ग्राहकांनी बाजारातून वस्तू खरेदी करताना अगोदर संपूर्ण माहिती घ्यावी त्यानंतरच वस्तूची खरेदी करावी वाजवीपेक्षा अधिक किमतीने वस्तूची विक्री केली आपले आर्थिक शोषण झाली असे आपल्याला वाटले तर आपण तक्रार करते व्हावे अशी आव्हान यावेळी करंजे यांनी केले.
कार्यक्रमाला पालम तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरवठा विभागाचे सोडगीर यांनी केले तर आभार प्रदर्शन पुराणिक यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिल्पा शिवनकर, महिपती सोनकांबळे ,माधव कांबळे आदिने परिश्रम घेतले.






