spot_img
spot_img
spot_img

परभणी जिल्हा परिषद सभापती* *निवडीसाठी 2 एप्रिल रोजी विशेष सभा*

 

 

परभणी, दि. 27 : परभणी जिल्हा परिषद येथील सभापती समाज कल्याण समिती व सभापती महिला व बालकल्याण समिती तसेच उर्वरित दोन विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडीसाठी गुरुवार, दि. 2 एप्रिल, 2026 रोजी दुपारी 2 वाजता आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.

 

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत असून सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्रे दि. 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत स्वीकारली जाणार आहेत. सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी सदर दिवशी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) डॉ. संदीप घोन्सीकर यांनी केले आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles